चंद्रभागा श्रीक्षेत्र
पंढरपूर हे
भिमा नदीच्या तीरावर आहे. भीमा नदिला भिवरादेखील म्हणतात, ही नदी इथे
अर्धचंद्राकार वाहते म्हणून तिला चंद्रभागा हे नांव आहे.
याविषयी
अख्यायिका
सांगितली जाते की, शापित चंद्राने इथे येवून या तीर्थात स्नान केले व तो
शापमुक्त झाला म्हणूनच ही नदी अर्धचंद्राकार वाहू लागली व लोक तिला
चंद्रभागा म्हणू लागले. काही संशोधकाचे मते
भागवताच्या स्कंद ५ अध्याय १९
मधील १८ व्या श्लोकात हिंदुस्थानातील महान नद्यांचे वर्णन करताना भागीरथी
व चंद्रभागा या नद्यांचे अस्तित्व दाखविलेले आहे. तसेच महाभारताच्या
भीष्मपर्वात अध्याय ९ मध्ये देखील चंद्रभागा नदीचा उल्लेख केलेला
आढऴतो. आनंद रामायणातदेखील भीमा नदीचा उल्लेख आढळतो. प्रभु रामचंद्रांनी
सीताशोधार्थ लंकेला जाताना या तीर्थक्षेत्राला भेट दिल्याचा प्रसंग
वर्णिला आहे.
धन्य
धन्य भिवरातट | चंद्रभागा वाहे निकट |
धन्य
धन्य
वाळुवंट | मुक्तिपेठ पंढरी |
असे
चंद्रभागेचे महत्व सांगितले आहे.
पंढरीचा
वास चंद्रभागे स्नान | आणिक दर्शन विठोबाचे ||
उभे
राहुनि
दर्शन मंडपी | कृतार्थ करील
जगजेठी ||
ज्या
वाळवंटी सकल संताची मांदियाळी कीर्तनरंगी नाचत, नामघोषात मग्न होवून
कृतार्थ झाली, त्या वाळवंटात नाचत जयघोष करावा आणि ज्या चंद्रभागेच्या
पवित्र स्नानाने संतासह लाखो भाविक, भक्त पापमुक्त झाले, धन्य झाले त्या
तीर्थात स्नान करण्याची, पावन होण्याची उत्कट इच्छा भक्तजनाच्या मनी
निर्माण होते.कोटी
कोटी जन्माचे पातक | नासे केलेया देख ||
एवढे
क्षेत्र अलौकिक | पांडुरंग भीवरा ||
अशी
या तीर्थस्नानाची ख्याती आहे.
भाविक
पंढरीत पाऊल ठेवताच प्रथम चंद्रभागेत स्नान करून पावन होतात. ज्या भक्तराज
पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी परब्रह्म परमात्मा पांडुरंग आला आणि त्याच्या
प्रार्थनेनुसार त्याने दिलेल्या विटेवर युगे अठ्ठावीस भक्तांना दर्शन देऊन
कृतार्थ करण्यासाठी भीमातीरी उभा राहिला आहे, त्या पुंडलिकाचे दर्शन
घेतात. चंद्रभागेच्या वाळवंटात अन्य संत मंडळीची समाधी स्थाने आहेत. नदीचे
पात्र विशाल, अर्धचंद्राकार व देखणे आहे.
पुंडलिक
मंदिर
भक्त पुंडलिकाचे मंदिर
चंद्रभागेच्या पात्रात, महाद्वार घाटासमोर आहे. हे
मंदिर चांगदेवाने बांधले आहे. मदिरामध्ये मोठा सभामंडप असुन आतिल बाजूस
गाभारा आहे. गाभर्यातील शिवलिंगावर पुंडलिकाचा पितळी मुखवटा आहे.
या
मुखवट्यावर टोप घालून नाममुद्रा लावुन पुजा केली जाते.तसेच पहाटेपासुन
रात्रीपर्यंत पुंडलिकाचे नित्योपचार,काकड आरती, महापूजा,
महानेवैद्य,धुपारती इत्यादी करतात. महाशिवरात्रीला या ठिकाणीमोठा उत्सव
असतो. चंद्रभागानदीला पूर आल्यावर पुंडलिकाचा चलमुखवटा उद्धव घाटावरील
महादेव मंदिरात ठेऊन तिथे पुजा व नित्योपचार केले जातात.
लोहदंड
तीर्थ
लोहदंड तीर्थ चंद्रभागेच्या पात्रात
पुंडलिकाच्या मंदिरासमोर आहे. विशेष म्हणजे इथे दगडी नाव तरंगते असे
म्हणतात. या तीर्थात स्नान केल्याने इंद्राच्या अंगावरील सहस्त्र छिद्रे
गेली आणि इंद्राच्या हातातील लोहदंड या तीर्थात तरंगला अशी आख्यायिका आहे.
लखुबाई
मंदिर
दगडी
पुलाजवळ दिंडीरवनात हे मंदिर आहे. भगवान श्रीकॄष्ण जेंव्हा
द्वारकेहून श्रीरुक्मिणीला शोधण्यास दिंडीरवनात आले तेंव्हा
त्यांची आणि
रुक्मिणीची भेट या वनात झाली.रुक्मिणी देवीचे तप करण्याचे स्थान
हेच
लखुबाईचे मंदिर
होय.पुर्वी या मंदिराभोवती पुष्कळ झाडी होती.
हे मंदिर पुर्णपणे दगडी बांधकाम केलेले असुन हेमाडपंथी पद्धतीचे
आहे या मंदिरात दसरा आणि नवरात्र हे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.
नामदेव
पायरी
अशी आख्यायिका सांगतात की संत
नामदेवांनी श्री पांडुरंगाला
सांगितले
की, " हे भगवंता! मला तुमचे वैकुंठपद नको त्यापेक्षा इथे
येणार्या
सर्व भक्तांच्या पायधुळ मला लागेल अशी जागा द्या". असे म्हणुन संत
नामदेवांनी मंदिराच्या पायरीकडे बघितले तर ती भुमी एकदम दुभंगली. या वेळी
भगवंत पांडुरंग संत नामदेवास म्हणाले की, " हे नामा,तुला ही भुमी दिली.
माझ्या दर्शनास येणार्या भक्तमंडळीची पायधुळ तुला लाभेल." नंतर
पांडुरंगास नामदेवांनी नमस्कार केला आणि त्या दुभंगलेल्या भुमीमध्ये उडी
टाकली.त्याचवेळी तिथे असलेल्या संत नामदेवांच्या मंडळींनी उड्या घेतल्या.
सर्व लोक बघत असतानाच भुमी एकदम पहिल्याप्रमाणे झाली.
ही घटना शके १२३८
आषाढ वद्य त्रयोदशीस
झाली. संत नामदेवांसह त्यांच्या परिवारातील ज्या १४ जणांनी उड्या घेतल्या
त्यात त्यांची आई गोणाई,वडिल दामाशेटी,पत्नी राजाई,चार पुत्र
श्रीनारायण,श्रीविठ्ठल,श्रीगोविंद,श्रीमहादेव तसेच तिघी सुना
गोडाई,येसाई,मखराई,मुलगी लिंबाई, बहिण आऊबाई,संत नामदेवांच्या दासी आणि
शिष्या संत जनाबाई यांचा समावेश होता. या ठिकाणी पुजेकरीता सर्व लोकांनी
पायरी केली आहे या पायरीस संत नामदेव पायरी असे म्हणतात.
गोपाळपूर
गोपाळपूर या ठिकाणी भगवान
श्रीकृष्णाचे मंदिर असुन हे मंदिर पंढरपूरापासुन
दक्षिण-पुर्व दिशेस दीड किमी अंतरावर आहे. हे मंदिर एका टेकडीवर आहे या
टेकडीस गोपाळपूर पर्वत म्हणुन संबोधतात. हा पर्वत म्हणजेच गोवर्धन पर्वत
आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे.
स्कंद पुराणातील 'पांडुरंग माहात्म्याच्या'
दुसर्या
अध्यायात
सांगितलेल्या कथेनुसार - श्रीकृष्ण पंढपूरास जाण्यास निघालेले पाहून
गोवर्धनही निघाले.कदाचित भगवान श्रीकृष्ण रागावतील म्हणुन ते इथे
दुसर्या रुपात आले. त्यांनी चंद्रभागा आणि पुष्पावती नदीच्या
संगमावरील गोपाळपूर गावाला माथ्यावर धारण केले आणि तेथेच राहिले.
गोपाळपूर मंदिराच्या पायथ्याशी यशोदेच्या दही
मंथनाची
प्रतिकात्मक जागा
आहे. पुर्वेस लक्ष्मीनारायणाचे मंदिर आहे.मंदिरास खाली पायथ्यापासून दगडी
पायर्या आहेत. मंदिरात अनेक खोल्या असुन तीन बाजूंनी दर्शन
दरवाजे
आहेत.मुख्य दरवाजा आकर्षक आणि भव्य आहे.
मंदिराच्या गाभार्यात गोपाळकृष्णाची वेणू
वाजवणारी
अत्यंत सुंदर
आणि
आकर्षक मुर्ती आहे. गोपाळकॄष्णाच्या दोन्ही बाजुला पंखा घेऊन उभ्या
असलेल्या गौळणी असुन खाली गाय आणि बछड्यांच्या मुर्ती आहेत.
विष्णुपद
भगवान श्रीकृष्ण श्रीक्षेत्री
येताना
गायी,
गोपासह येवून प्रथम गोपाळपूर येथे थांबले होते. त्यावेळी त्यांचे
पायाचे,गायीच्या खुरांच्या खुणा दगडावर उमटलेल्या असून सध्या त्याठिकाणास
विष्णुपद म्हणतात. त्याचेच समोर देवर्षी नारदाचे मंदिर आहे.मार्गशीर्ष
महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर या विष्णुपदावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी
असते. श्रीभगवान श्रीकृष्ण श्रीक्षेत्रात प्रथम येथे आले व ते मार्गशीर्ष
महिन्यात होते त्यांचे वास्तव्य होते म्हणून त्या ठिकाणी दर्शनासाठी भाविक
जातात, असे म्हटले जाते. त्या एक महिन्याचे काळात याठिकाणी दररोज अभिषेक
पूजाविधी केले जातात.भगवान श्रीकृष्ण श्रीक्षेत्री येताना गायी, गोपासह
येवून प्रथम गोपाळपूर येथे थांबले होते. त्यावेळी त्यांचे पायाचे,गायीच्या
खुरांच्या खुणा दगडावर उमटलेल्या असून सध्या त्याठिकाणास विष्णुपद
म्हणतात. त्याचेच समोर देवर्षी नारदाचे मंदिर आहे.मार्गशीर्ष महिन्यामध्ये
पूर्ण महिनाभर या विष्णुपदावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. श्रीभगवान
श्रीकृष्ण श्रीक्षेत्रात प्रथम येथे आले व ते मार्गशीर्ष महिन्यात होते
त्यांचे वास्तव्य होते म्हणून त्या ठिकाणी दर्शनासाठी भाविक जातात, असे
म्हटले जाते. त्या एक महिन्याचे काळात याठिकाणी दररोज अभिषेक पूजाविधी
केले जातात.