DD Logo
e-Pooja Booking

RePrint Pooja Receipt
श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या पूजा बुकिंग हे ०७-१०-२०२४ ते ३१-१२-२०२४ पर्यंतचे आहे. संपर्कसाठी नित्योपचार विभाग : ०२१८६-२९९२९९
सूचना :- ऑनलाईन बुकिंग दि. ०१/१०/२०२४ पासून सकाळी ११ नंतर चालू होईल. तसेच ०१/१०/२०२४ बुकिंग चालू झाले नंतर दि. ०७/१०/२०२४ पासून पुढील दिवसांचे बुकिंग उपलब्ध असेल याची भाविकांनी नोंद घ्यावी.


—: नित्यपुजा :—

या पुजेमध्ये भाविकांचे गौत्र/आडनाव, नाव उच्चारून पुजेस आरंभ केला जातो. पुजेमध्ये भाविकांतर्फे श्रींस गंध लावला जातो व तुळशी फुले अर्पण केले जातात. तसेच खडीसाखरेचा नैवेद्य दाखविला जातो.आरती झालेनंतर श्रींस हार फुले घालुन पेढे - बर्फीचा व फळांचा नैवेद्य दाखविला जातो. भाविकांना प्रसाद म्हणून श्रीं.जवळ पेढे - बर्फी, फळे व श्रीफळ देण्यात येते.

वेळ : पहाटे ०३:३० वाजता.

How to Book Pooja

Nitya Pooja Pass Donation Rs.: 25000.00



—: पाद्यपुजा :—

भाविकांचे गौत्र/आडनाव, नाव उच्चारून पुजेस आरंभ केला जातो. श्रींच्या चरणावर चांदीचे कवच ठेवून त्यावर दही, दूध, मध, पीठी साखर,पाणी अर्पण केले जाते. पाण्याने चरण स्वच्छ केले जातात. हळद, कुंकू, बुक्का, अष्टगंध वाहून हार, तुळशी, फुले अर्पण करून धुप ओवाळून पेढे - बर्फीचा व फळांचा प्रसाद दाखविला जातो. भाविकांना प्रसाद म्हणून श्रीं.जवळ पेढे - बर्फी, फळे व श्रीफळ देण्यात येते.

वेळ : रात्री १०.३५ वाजता.


How to Book Pooja

Padya Pooja Pass Donation Rs.: 5000.00


—: तुळशी अर्चन पूजा :—

भाविकांच्या हस्ते संकल्प, श्री गणपती स्मरण व श्री विष्णूसहस्त्रनाम स्तोञ पठण केले जाते.ते करत आसताना तुळशी पत्र ताम्हण/पात्रामध्ये संचय करून भाविकांच्या हातात पूजेचे ताम्हण (संचय केलेले तुळशी पत्र, फुलांचा व तुळशीचा हार,पेढे-बर्फी व श्रीफळ) घेवून भाविकांना श्रींच्या गाभा-यामध्ये प्रवेश देण्यात येईल. श्रीं.च्या चरणावर संचय केलेले तुळशी पञ फुलांचा व तुळशीचा हार आपल्या हस्ते अर्पण करण्यात येईल. त्यावेळेस श्री विठ्ठलाजवळील पुजारी भाविकांना पेढे बर्फी व श्रीफळ प्रसाद म्हणुन देतील.

वेळ : सकाळी १०.०० , दुपारी ०४.०० , संध्याकाळी ०६.०० वाजता.

How to Book Pooja

Tulsi Archan Pass Donation Rs.: 2100.00