परिवार
देवता
1) संत नामदेव
पायरी
श्रीविठ्ठलरूक्मिणी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार - या प्रवेशद्वाराच्या
पहिल्या पायरीस श्रीसंतनामदेव पायरी म्हणतात. संत नामदेव महाराज हे श्री
विठ्ठलाचे लाडके भक्त होते. त्यांनी विठ्ठल नामाचा प्रचार व प्रसार सर्व
भारतभर केला. लोकांना भक्तिमार्गाची उज्वल पंरपरा सांगितली. सांप्रत
कलियुगामध्ये नामस्मरणातच समस्त जीव मायांचा उद्धार होणार आहे. म्हणून
भक्तीयुक्त अंत:करणाने सर्वांनी नामस्मरण करावे, कारण फक्त नामस्मरणानेच
जीव अंतर्बाह्य शुद्ध होतो. हे नामदेव महाराजांनी आपल्या अचरणातून दाखवून
दिले.
म्हणून ते देवाचे
लाडके भक्त होते. देवांनी त्यांच्या सर्व इच्छा परिपूर्ण केल्या. श्री संत
नामदेव महाराजांची अंतिम इच्छा एकच होती की, देवा तुझ्या दर्शनाला
येणार्या भाविक भक्तांच्या चरणाची धूळ माझ्या मस्तकी लागावी,
याचे कारण एकच होते की,
या नामदेव पायरीपाशी जो भाविक नतमस्तक होतो, तेव्हा तो अंतर्बाह्य
नामस्मरणाने शुद्ध होतो व देवाच्या दर्शनाचा अधिकारी होतो. वास्तविक सर्व
मंदिरांच्या, घरांच्या प्रवेशद्वारांवर गणपती असतात, तीर्थक्षेत्र
पंढरपूरात मात्र नामदेवाची पायरी आहे. कारण, आधी
नाम मग देव |
2) गणपती
मंदिर
श्रीसंतनामदेवपायरीचे दर्शन घेवून वर आल्यानंतर प्रथम दर्शन होते ते श्री
गणरायाचे. या मुर्तीस सिद्धिविनायक म्हणतात. ही महाकाय सुंदर श्रींची
मूर्ती पाहिल्याबरोबर भाविकांच्या मुखामधून आपोआप गणरायाचा जयजयकार होतो.
वक्रतुंड
महाकाय सूर्यकोटी समप्रभ | निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येर्षु सर्वदा
|| अशी प्रार्थना करतो.
श्रींच्या दर्शनाकरिता जाताना या मूर्तीचे दर्शन घेतले असता मन, बुद्धी
शुद्ध होते. मनात चांगले विचार निर्माण होतात. कारण हा गणेश बुद्धिदाता,
विघ्नहर्ता, मोक्षदाता आहे. भाविकांच्या मनातील चांगल्या इच्छा देव
श्रीगजानन ओळखतात व भक्तास शुभाशीर्वाद देतात, म्हणून या गणरायाचे दर्शन
घेवूनच भाविक भक्त मुख्य सभामंडपात प्रवेश करतात.
3)
दत्तमंदिर
सभामंडपाच्या डाव्या बाजुस श्री दत्तात्रयांच्या संगमरवरी मूर्तीचे दर्शन
होते. ही दत्तात्रयांची मूर्ती पाश्चिमाभिमुख आहे. या मूर्तीचे दर्शन
घेतले असता....
मी तू पणाची
झाली बोळवण - एका जनार्दनी श्री दत्त ध्यान |
विठ्ठलाचे दर्शनास जाताना भक्तांच्या मनामध्ये मी, तू, लहान, थोर, गरीब,
श्रीमंत हा भाव राहत नाही. म्हणूनच या दत्तात्रयाचे दर्शन सर्व भाविक
घेतात व विनम्र होवून विठ्ठलाचे दर्शनास जातात. या दत्तमंदिरात मार्गशीर्ष
महिन्यात दत्तजयंती दिनी मोठा जन्मोत्सव होतो. भाविक भक्त त्याचा आनंद
घेतात.
4)
दास मारूती
भव्य,
दिव्य, महाकाय, महावीर मारूतीरायाचे
दर्शन होते. हा मारूती
रामदासस्वामींनी स्थापन केलेला आहे. या मारूतीचे दर्शन घेतले असता
मनामध्ये कोणत्याही प्रकारचे भय राहत नाही, कुठलीही संकटे राहत नाहीत.
सर्व कार्यामध्ये विजय प्राप्त करून देणारा मारूती आहे. ही भव्य दिव्य
शेंदरी मुर्ती आहे. शनिवार, पौर्णिमा, अमावस्या या दिवशी भाविक भक्त
आवर्जूर्ुन दर्शन घेतात. मारूती रायास
रूईच्या पानाचा हार, उडीद, तेल, गूळ, मीठ वाहतात व आपल्या जीवनातील सर्व
संकटे निवारण करण्यासाठी प्रार्थना करतात. मनापासून केलेल्या प्रार्थनेला
मारूतीराया आशीर्वाद देतात व भक्तांची संकटे दूर करतात. या मूर्तीसमोर
रामरक्षा पठण केली असता भक्तांच्या भोवती रक्षाकवच प्राप्त होते, यास दास
मारूती म्हणतात.
5)
श्रीनृसिंह मंदिर
भगवान
महाविष्णुंच्या
दशावतारातील चौथा अवतार नृसिंहाचा आहे.
हिरण्यकश्यपुचा वध केल्यानंतर नृसिंहाना राग अनावर झाला. देव जळी, स्थळी,
काष्ठी, पाषाणी सर्वत्र भरून उरलेला आहे. महावैष्णव भक्तराज प्रल्हादाने
महाबली, गर्विष्ठ, अविवेकी सूडाच्या भावनेने
पेटलेल्या आपल्या पित्याला म्हणजेच हिरण्यकशिपुला दाखवून दिले की,
भगवंताचे नामस्मरण केले असताना, आर्त भावनेने देवाला संकट निवारणासाठी
बोलविले तर क्षणाचाही विलंब न करता देव प्रकट होतो व भक्तांच्या संकटांचे
निवारण करतो. या ठिकाणी लक्ष्मी ही नृसिंहाच्या मांडीवर दिसत आहे. व समोरच
भक्तराज प्रल्हाद हात जोडून उभे आहेत. येथे भक्तप्रल्हादासह नृसिंहाचे
दर्शन घेतात. भक्तप्रल्हादाप्रमाणे त्यांच्याही मनामध्ये हरिभक्ती जागृत
होवो अशी प्रार्थना करतात. लक्ष्मीनृसिंहाचे दर्शन घेतले असता हरिभक्तीचा
लाभ होतो. भक्तासाठी देव कुठल्याही क्षणी धावून येतो.
6)
एकमुखी दत्त
नृसिंहमंदिराच्या
शेजारीच एकमुखी दत्तमंदिर आहे. ही एकमुखी दत्ताची मूर्ती
माहुरगड निवासी आहे. मूर्ती काळ्या पाषाणाची असून दक्षिणाभिमुख आहे. माता
अनसूयाची सत्वपरीक्षा घेतल्यानंतर बह्मा, विष्णू, महेश या तीनही देवतांना
लहान बाळे होवून रहावे लागले.
ही लीला पाहून लक्ष्मी, पार्वती व सावित्री यांचा गर्व हराण झाला.
पतिव्रतेची शक्ती श्रेष्ठ आहे. तीनही देवांना आपल्या पातिव्रत्याच्या
सामर्थ्यांने लहान बाळ बनविले तेव्हा मातेची इच्छा पूर्ण करण्याकरिता
भगवान महाविष्णू दत्त म्हणून कायम उभे राहिले व जगाचा उद्धार करू लागले.
कराया उद्धार
जगाचा | जाहला बाळ अत्रिऋषीचा ||
या दत्तमूर्तीस एक मुख व सहा हात आहेत. या मूर्तीच्या दर्शनाचा लाभ घेतला
असता मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. विशेषता पुत्रप्राप्तीसाठी
स्री-पुरूष या दत्तात्रयांचे दर्शन घेतात. मनापासून, श्रद्धेने दर्शन
घेतल्यास नक्कीच पुत्रप्राप्तीचा लाभ होतो असे भाविक म्हणतात.
7)
श्रीरामेश्वर
श्रीप्रभु
रामचंद्र सीताशोधार्थ श्रीलंकेस जात असताना त्यांनी शिवलिंगाची
स्थापना केली. त्यास रामेश्वर लिंग असे म्हणतात. याचे दर्शन घेतले असता
हरिहराच्या दर्शनाचा लाभ
होतो. हा रामेश्वर ज्या लक्ष्मीनारायणाचे ध्यान करीत असतो त्या
बिंदुमाधवाने लक्ष्मीला मांडीवर घेतलेल्या भव्य मूर्तीचे दर्शन होते.
चारधामापैकी रामेश्वरधामाने फल मिळते.
8)
श्रीलक्ष्मीनारायण मंदिर
सुंदर
अशा संगमरवरी पाषाणातील लक्ष्मीनारायणाची
मूर्ती
पाहताच भाविक
नतमस्तक होतात. या ठिकाणी दर्शन केले असता बद्रीनाथ धामाच्या
दर्शनाचे फळ
मिळते.
9)
काशिविश्वनाथ मंदिर
या
ठिकाणी
काशिविश्वनाथाचे दर्शन घेतले असता काशियात्रेचे फल मिळते म्हणून
भाविक येथे मोठ्या श्रद्धेने
महादेवाचा जयजयकार करतात व
म्हणतात...
हर
हर महादेव शंभो | काशि विश्वनाथ गंगे ||
10) श्रीगणपती
मंदिर
भक्तांना
सद्बुद्धी प्रदान करणाऱ्या पूर्वाभिमुख गणरायाचेदर्शन होते .सर्वसिद्धी
प्राप्त करून देणारे गणेशजी आहेत. मूर्ती अत्यंत मनमोहक आहे.
या मंगल मूर्तीचे दर्शन घेतात आणि भाविक मंगलमुर्ती
मोरया | गणपती बाप्पा मोरया || अशी
गर्जना करतात.
11)
श्रीनवग्रह मंदिर
या
ठिकाणी
आदित्यादी नवग्रह, द्किपाल, क्षेत्रपाल यांचे दर्शन होते. या
मूर्तीवर शनिमहाराजांचे सुंदर शिल्प कोरलेले आहे. पीडापरिहारार्थ लोक इथे
शनिवारी, अमावस्येला अभिषेक पूजा करतात व दर्शन घेवून सर्व पीडांचे निवारण
होवो अशी याचना करतात.
12) श्री दत्त
मंदिर
नवग्रह
मंदिराच्या उजव्या कोपऱ्यात एका छोट्या कोनाड्यात संगमरवरी
श्रीदत्तात्रयांची मूर्ती आहे. गुरूवारी पुष्प्यनक्षत्रावर या
दत्तात्रेयाचे दर्शन केले असता धन-धान्याची समृद्धी होते व सद्गुरूची कृपा
होते. दत्तजयंती वेळी अभिषेक पूजा करून सर्वांना प्रसाद देतात.
13)
श्री कालभैरव मंदिर
श्री
लक्ष्मीनारायण व काशिविश्वेश्वर मंदिराच्या जवळ पंढरीचे रक्षण करणारे
कालभैरव आहेत. अष्ट भैरवांपैकी हे एक आहेत.
जे अन्याय
करिती अखंड | त्यासी भैरव मारती प्रचंड ||
क्षेत्री दूष्टकृत्य आचारती जे मूढ | त्यासी भैरव दृढ विघ्न करिता ||
असे हे कालभैरव होय.
14)
श्रीचिंतामणी गणपती मंदिर
पुर्वेकडे
तोंड करून असलेल्या या मंदिरात शेंदूर लावलेली गणपतीची मूर्ती
आहे. त्याच्या समोरच चिंतामणी ओटा आहे. या चिंतामणीस स्पर्श केला असता
मनीची इच्छा परिपूर्ण होणार असेल तर तो कौल देतो.
15)
सूर्यनारायण मंदिर
पूर्वेकडे
तोंड करून बसलेली सुमारे 1 फूट उंचीची
सुर्यनारायणाची
मूर्ती आहे.
16) मारूती
मंदिर
दक्षिणेकडे
तोंड करून असलेली अर्धामीटर उंचीची हात जोडून उभी
असलेली
मारूतीची शेंदरी मूर्ती आहे.
17)
गोपाळकृष्ण मंदिर
संगमरवरी
दगडाची कालिया नागाच्या फण्यावर नृत्य करणारी गोपाळकृष्णाची
मूर्ती आहे. शेजारी लहान गणपतीची संगमरवरी मूर्ती आहे.
18)
अंबाबाईची मुर्ती
अष्ठभुजा
म्हैसासूर वर्दिनी अशी काळ्यापाषाणाची अयोध्ये हातामध्ये घेतलेली
अंबाबाईची मुर्ती आहे.
19) खंडोबा
मंदिर
मल्हारी
म्हाळसाकांत मंदिरातील पाषाणाची अश्वारूढ अशी मूर्ती आहे. शेजारी
नागनाथ व अंबाबाईची लहान मूर्ती आहे.
19) महादेव
मंदिर
शिवशंकराचे
एक लहान मंदिर आहे, त्यामध्ये नैऋत्य दिशेस महादेवाची साळुंका
आहे. त्याला गुप्तलिंग महादेव असे संबोधले जाते.
20) धुंडीराज
गणपती मंदिर
पश्चिमेकडे
तोंड करून असलेली गणपतीची सुमारे अर्धामीटर उंचीची शेंदराचे
विलेपण केलेली गणपतीची मूर्ती आहे. त्याला धुंडीराज गणपती असे म्हणतात.
|