भौगोलिक पंढरपुर
पंढरपूर हे शहर सोलापूर जिल्ह्यात असून भौगोलिक दृष्ट्या ते पश्चिम पट्‌ट्यामध्ये येते. भीमा नदीवर उजनी येथे असलेल्या धरणामुळे भीमा नदी सतत वाहत असते. भीमा नदीलाच तिच्या पंढरपूर येथील चंद्राकार आकारामुळे चंद्रभागा असे म्हटले जाते. परिसरात होणारे पर्जन्यमान सरासरीचे असते. निरा आणि भीमा नदीच्या पाण्यामुळे पंढरपूरचा परिसर सुजलाम् सुफलाम् आहे. पंढरपूर तालुक्यामध्ये  सहकारी तत्वावरील साखर कारखाने असून फळबाग लागवडीमध्ये, दूध उत्पादनामध्ये पंढरपूर अग्रेसर आहे. विशेषत: द्राक्षे आणि डाळींब मोठ्या प्रमाणावर उत्पादित होते. पंढरपूर हे शहर वेगवेगळ्या रस्त्यांनी जोडलेले आहे. प्रमुख रस्ते मार्ग खाली नमूद केलेप्रमाणे आहेत

. 1) प्रमुख रस्ते -

(राज्य महामार्ग) 

  • सोलापूर- मोहोळ - पंढरपूर- 74 कि.मी.
  • कुर्डुवाडी- शेटफळ-पंढरपूर-48 कि.मी.
  • सातारा-फलटण-सासवड- माळशिरस-नातेपुते-पंढरपूर- 210 कि.मी. 
  • सातारा-दहिवडी-पंढरपूर- 190 कि.मी. 
  • जत -सांगली- सांगोला- पंढरपूर-141 कि.मी. 
  • बिजापूर- मंगळवेढा- झळकी-पंढरपूर- 115 कि.मी. 
  • नगर- करमाळा- टेंभुर्णी-पंढरपूर-125 कि.मी. 
  • कराड-महाड-पंढरपूर-195 कि.मी. 

2) रेल्वे मार्ग -

पंढरपूर हे दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरील कुर्डूवाडी या रेल्वेजंक्शन ने जोडलेले आहे. तसेच मिरज - पंढरपूर रेल्वे मार्गाने जोडलेले आहे. या मार्गावर धावणाऱ्या प्रमुख रेल्वे 

  • मुंबई- पंढरपूर 
  • मिरज -पंढरपूर
  • लातुर - पंढरपूर
  • उस्मानाबाद - पंढरपूर

3) हवाई मार्ग -

पंढरपूर पासून जवळ असणारी विमानतळे 

  • सोलापूर- 75 कि.मी. 
  • पुणे -210 कि.मी. 
  • सांगली- 120 कि.मी.