शेजआरती
साधारणत: रात्रौ 11 ते 11.15चे दरम्यान
श्रीविठ्ठलाकडील व रूक्मिणीमातेकडील दर्शन संपवून गाभारा स्वच्छ केला
जातो.त्यांनतर शेजारतीसाठीची तयारी केली जाते. शेजारतीसाठी लागणार्या
सर्व साहित्य ताम्हणपात्रामध्ये घेवून गाभाऱ्यामध्ये उपलब्ध करून दिले
जाते. श्रीविठ्ठल व रूक्मिणीमातेचे पाय धुवून पुजेला सुरवात होते. देवाचा
व रूक्मिणीमातेचा दुपारी 4 वाजता केलेला पोषाख बदलला जातो. देवास धोतर
नेसवले जाते. (एकादशीस सोवळे) देवाच्या अंगावर शाल पांघरली जाते. देवास
पांढरे किंवा लाल रंगाचे पागोटे बांधले जाते. देवाच्या पायापासून
शेजगृहापर्यंत पाऊलघडी घातली जाते. पागोटे बांधलेनंतर देवास गंध अक्षद
करून हार-तुरे कंठा घालून धूप, दीप करून नैवेद्य समर्पण केला जातो व
देवाची शेजारती सूरू होते. त्यावेळेस नाथ महाराजांनी केलेली
हरि चला मंदिरा ऐशा
म्हणती गोपिका,
ऐशी म्हणती राधिका | भावे ओवाळती यादकुळटिलका ||
एकीकाडे राही ,एकीकडे
रखुमाई | भावे ओवाळिता हरि झाले दोठायी ||
अष्टादिक सोळा
सहश्त्र ज्यांच्या सुंदरा | ज्यां ज्यांने पार्थिले गेले तयांच्या घरा ||
एका जनार्दनी हरि तू
लाघवे होशी | इत्यादि भोगोनि ब्रम्हचारी म्हणविशी ||
अशा तर्हेने आरती म्हणली जाते व मंत्र अक्षदा वाहून शेजारतीचा भाग
पूर्ण होतो.
संकल्प करून देवाचे पाद प्रक्षाळण केले जाते, श्रींच्या मुखास अत्तर व गंध
लावून विष्णू सहस्त्र नामाचा पाठ म्हणून श्रीच्या चरणावर तुळशी वाहिल्या
जातात. नंतर हार-तुरा घालून धूप, दीप करून नैवेद्य विडा दाखवून पाचारतीस
आरंभ होतो. देवाच्या अंगावर गुलाब पाणी वाहिले जाते, अत्तर लावले जाते,
विड्याचे साहित्य दाखविले जाते व पाचारतीस सुरवात होते. सदर वेळी
ह.भ.प.तुकाराम महाराज व ह.भ.प.नाथ महाराज यांनी रचलेल्या पाच आरत्या
केल्या जातात. तसेच श्रींच्या गाभाऱ्यापासून शयन मंदिरापर्यंत चंदनाचा सडा
टाकून हरि नारायण हरि हे म्हणत श्रीं चा दरवाजा बंद केला जातो.
आरती-1
काय तुमचा महिमा
वर्णू मी किती | नाम मात्रे भवपाश तुटती ||
पहाता पाऊले हे
विष्णुमूर्ती | कोटी कुळा हीत जग उद्धरती ||
जय देव जय देव जय
पंढरीराया | करूनिया कुरवंडी सांडवीन काया || जय देव जय देव ||ध्रु.||
मंगल आरतीचा थोर
महिमा | आणिक द्यावया नाही उपमा ||
श्रीमुखासहित देखे ते
कर्मा पासून तुटे | जैसा रवि नाशि तमा || जय देव जय देव ||ध्रु.||
धन्य व्रत काळ हे
एकादशी | जागरण उपवास घडे जयाशी ||
श्री विष्णूचे पुजन
एका भाषेशी | नित्य मुक्त वंद्य तिडी एकमेकांशी || जय देव जय देव
||ध्रु.||
नवजवाया काळ हेचि तुज
घ्याती | अखंड वास तुझा जयाचे चित्ती ||
घालेयेणे प्रेमे सदा
डुल्लती | तीर्थ महिमा वाम तयाचा पहाती || जय देव जय देव || ध्रु.||
देव भक्त तुचि झालासि
दोन्ही | वाढावया सुख भक्ति हे जननी ||
जड जीवा उद्वार
व्हाया लागुनि चरणी तुकया बंदी पाऊले दोन्ही || जय देव जय देव ||ध्रु.||
करूनिया कुरवंडी
सांडविन काया || जय देव जय देव ||ध्रु.|| हरि नारायण हरि
आरती -2
हरिचला मंदिरा ऐशा म्हणती गोपिका, ऐशी
म्हणती राधिका | भावे ओवाळती यादकुळटिलका ||
ऐकीकाडे राही
,एकीकडे रखुमाई | भावे ओवाळिता हरि झाले दोठायी || अष्टादिक सोळा सहश्त्र
ज्यांच्या सुंदरा | ज्यां ज्यांने पार्थिले गेले तयांच्या घरा ||
एका जनार्दनी हरि तू
लाघवे होशी | इत्यादि भोगोनि ब्रम्हचारी म्हणविशी || हरि नारायण हरि
आरती -3
चरण कमल ज्याचे
अतिसुमार | ध्वज वजराकंुश शोभे चरणे ब्रिदाचा तोडर || ओवाळू आरती मदन
गोपाळा | शाम सुंदर गळा, वैजंयती माळा ||
नाभिकमल ज्याचे
ब्रह्माचे स्थान | हऋदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन || श्रीमुख कमल ज्याचे
पहाता सुखाच्या कोटे | वेधले माणशे लुब्धली दृष्ठी ||
एका जनार्दनी देखिले
रूप | रूप पाहता अवघे झाले तद्रूप || हरि नारायण हरि
आरती -4
संत सनकादिक भक्त
मिळाले आणिक | साधू मिळाले अनेक ||
स्वानंद गर्जती पाहू
आले कौतुक | नवल होत आहे देवाधिदेवा ||
विठोबा देवाधिदेवा
स्वर्गीहून सुरवर पाहू यथाति केशवा || ध्रु.||
नरनारीचे तटस्थ नयना
| ओवाळिता श्रीमुख धनीन पुरे म्हणा||
एका जनार्दनी मंगल
आरत्या गाती| मंगल कौतुके गाती ||
मिळाले वैष्णव जय जय
कार गर्जती || हरि नारायण हरि
आरती -5
करूनिया आरती
चक्रपाणी ओवाळती | आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस ||
पहापहावो सकळा
पुण्यवंत तुम्ही बाळा | आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस ||
तुका वाहे टाळी उभा
सन्निध्य जवळि | आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस || हरि नारायण हरि
|