पोषाख
दररोज दुपारी 4.30 वाजता श्री विठ्ठल रूक्मिणीच्या अंगावरील कपडे बदलले जातात त्यावेळी धोतर किंवा सोवळे अंगी उपरणे, श्रीरूक्मिणीमातेस शालू असे कपडे वापरले जातात. पोषाखासाठी लागणारी कपडे भाविकांनी दिलेल्या वस्त्रांमधून किंवा मंदिर समितीच्या वतीने पुरविली जातात. श्री विट्ठलास रेशमी मोठ्या काठाचे धोतर, रेशमी मोठ्या काठाचे सोवळे किंवा जरी काठाचे धोतर, वेलवेट अंगी किंवा जरीची अंगी, शेला किंवा उपरणे व रूक्मिणीमातेस नऊवारी जरीची साडी किंवा पैठणी इ.वस्रे वापरले जातात. देवांच्या/ रूक्मिणी मातेच्या मुखास अत्तर, गंध, अक्षदा, हारतुरा वगैरे वापरले जाते. त्यानंतर श्रीविठ्ठलाकडे व रूक्मिणीमातेस लाडवाचा नैवेद्य समर्पित केला जातो. नंतर तांबुल /विडा श्रींस समर्पित केला जातो.

श्रीविठ्ठलरूक्मिणी देवास पोषाख झालनंतर दाखविणेत येणारे नैवेद्य
1 लाडू
2 विडा
पोषाखासाठी साधारणपणे 30 मिनिटांचा अवधी लागतो.