महानैवेद्य
दररोज सकाळी 11.00 वाजता श्रीविठ्ठलरूक्मिणीस महानैवेद्य समर्पण केला जातो. दररोज श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेस पंचपक्वान्नाचा महानैवेद्य समर्पण केला जातो.यामध्ये पांढराभात, साखरभात, पुरणपोळी, साधीपोळी, पुरी, पातळ भाजी, मोकळी भाजी, कढी, वरण, शेवयाची खिर, लाडू, चटणी, कोशिंबिर, भजी, पापड, आळुवडी, बासुंदी, श्रीखंड, लिंबू, खोबरे किस, कोथिंबिर, विड्याचा पानाचा गोविंद विडा याप्रमाणे श्रीविठ्ठलाला व श्रीरूक्मिणीमातेला नैवेद्य समर्पण केला जातो. श्रीविठ्ठलरूक्मिणी मंदिरसमिती मार्फत महानैवेद्यासाठी योजना करणेत आलेली आहे. या मध्ये भाविक भक्तांनी रू. अकराहजार कायम स्वरूपी ठेव ठेवल्यास येणाऱ्या व्याजाच्या उत्पन्नातून समितीने किंवा त्यांनी निश्चित केलेल्या दिवशी श्रींचा व रूक्मिणी मातेचा नैवेद्य भाविकाच्या वतीने करणेत येतो. महानैवेद्याच्या वेळी त्या भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जातो.व तो नैवेद्य समर्पण झाल्यानंतर त्या भाविक भक्ताला दिला जातो. महानैवैद्य