धूपारती
सायं. 6.45 चे दरम्यान (दिनमानाप्रमाणे) श्रीविठ्ठलरूक्मिणीची धूपारती केली जाते. त्यावेळी श्रीविठ्ठलरूक्मिणीचे पाय धुणे, मुख प्रशाळण करणे, अत्तर गंध , अक्षद लावणे, हारतुरे घालणे, धूप, दीप करून नैवेद्य दाखविणे व नामदेव रायांनी केलेली युगे अठ्ठावीस विटेवरी उभा, वामांगि रूक्मायी दिसे दिव्य शोभा ही आरती म्हणली जाते.