आरती
श्रीपांडुरंगाची
युगे
अठ्ठावीस विटेवरीं उभा
वामांगी रखुमाई दिसे
दिव्य शोभा
पुंडलिकाचे भेटी
परब्रम्ह आले गा ||
चरणी वाहे भीमा
उद्धरी जगा ||1||
जय देव जय देव जय
पांडुरंगा |
रखुमाई वल्लभा
राहीच्या वल्लभा पावे जिवलगा ||धृ||
तुळसी माळा गळा कर
ठेवूनि कटी ||
कांसे पीतांबर
कस्तुरि लल्लाटी ||
देव सुरवर नित्य येती
भेटी |
गरूड हनुमंत सन्मुख
उभे राहती ||जय.||2||
धन्य वेणूनाद
अनुक्षेत्रपाळा |
सुवर्णाची कमळे
वनमाळा गळां ||
राही रखुमाबाई राणीया
सकळा |
ओंवाळिती राजा विठोबा
सावळा ||जय||3||
ओंवाळू आरत्या
कुर्वंड्या येती ||
चद्रभागेमाजी
सोडुनियां देती ||
दिंड्या पताका
वंैष्णव नाचती |
पंढरीचा महिमा
वर्णावा किती || जय || 4 ||
आषाढी कार्तिकी
भक्तजन येती ||
चंद्रभागेमाजीं
स्नाने जे करिती ||
दर्शनहेळामात्रें
तयां होय मुक्ति ||
केशवासी नामदेव भावे
ओंवाळिती || जय || 5 ||
|