विठ्ठल रुक्मिणी ऑनलाईन दर्शन आणि ऑनलाईन डोनेशनची सुविधा लवकरच...

आरती श्रीगणपतीची
सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विन्घाची ||
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ||
सर्वांगी सुंदर उटि शेंदूराची ||
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ||1||
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ||
दर्शनमात्रे मनकामना पुरती || धृ ||
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ||
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ||
हिरेजडीत मुगुट शोभतो बरा ||
रूणझुणती नूपुरे चरणी घागरिया ||2||
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ||
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ||
दास रामाचा वाट पाहे सदना ||
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना || जय0||