विठ्ठल रुक्मिणी ऑनलाईन दर्शन आणि ऑनलाईन डोनेशनची सुविधा लवकरच...

!!आरती श्री ज्ञानदेवाची!!
आरती ज्ञानराजा | महा कैवल्य तेजा || सेविती साधु संत | मनु वेधला माझा ||1||
आरती ज्ञानराजा || धृ.||
लोपले ज्ञान जगी | हित नेणती कोणी | अवतार पांडुरंग | नांव ठेविलें ज्ञानी ||2||
प्रगट गुह्य बोले | विश्व ब्रम्हचि केलें | रामा जनार्दनीं | पायीं टकची ठेले ||3||