श्री संत विसोबा खेचर
माझी मूळपीठिका सोपान सद्गुरू | तेणे माया करू ठेवलिया ||
त्याचे कृपेकरून मीपण ठकलो | देहेभावा गेलो विसरूनिया ||
चांगयाचा अंगीकार मुक्ताईने केला | सोपान वोळला मजवरी ||
जन्ममरणाचे भय नाही आता | खेचरी तत्वता मुद्र दिली ||
जिकडे पाहे तिकडे आनंद भरला | खेचर सामावला तयामाजी ||
|