श्री संत शेख महमंद ऐसे केले या गोपाळे | नाही सोवळे ओवळे || काटे केतकीच्या झाडा | आंत जन्मला केवडा || फणसाअंगी काटे | आंत अमृताचे साठे || नारळ वरूता कठिण | परी अंतरी जीवन || शेख मंहमंद अविंध | त्याचे ह्रदय गोविंद ||