श्री संत सावता महाराज
कांदा मुळा भाजी | अवघी विठाबाई माझी ||
लसूण मिरची कोथिंबिरी | अवघा झाला माझा हरी ||
मोट नाडा विहीर दोरी | अवघी व्यापिली पंढरी ||
सावता म्हणे केला मळा | विठ्ठलपायी गोविला गळा ||
नामचिया बळे न भीऊ सर्वथा | कळिकाळाच्या माथा सोटे मारू ||
वैंकुठीचा देव आणू या किर्तनी | विठ्ठल गाऊनी नाचो रंगी ||
सुखाचा सोहळा करूनि दिवाळी | प्रेमे वनमाळी चित्ती धरू ||
सावता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा | तेणे मुक्ति द्वारा वोळंगती ||
|