श्री संत गोरा कुंभार

मुकया साखर चाखाया दिली | बोलताही बोली बोलवेना ||
तो काय शब्द खुंटला संवाद | आपला आंनंद अवधाराया ||
आनंदी आनंद मिळोनी राहणे | अखंडित होणे नहोनिया ||
म्हणे गोरा कुंभार जीवनमुक्त होणे | जग हे करणे शहाणे बापा ||

ब्रम्हमुर्ती संत जगी अवतरले | उद्धराया आले दीनजना ||
ब्रम्हादिक ज्याचे वंदिती पायवणी | नाम घेता वदनी दोष जाती ||
हो का दुराचारी विषयी आसक्त | संतकृपे त्वरित उद्धरती ||
अखंडित गोरा त्याची वाट पाहे | निशिदिनी ध्यायें संतसंगी ||