Sant Eknath
श्री संत एकनाथ महाराज

माझे माहेर पंढरी | आहे भीवरेची तीरी |
बाप आणि आई | माझी विठ्ठल रखुमाई ||
पुंडलिक आहे बंधू | त्याची ख्याती काय सांगू ||
माझी बहिण चंद्रभागा | करीतसे पापभंगा ||
एका जनार्दनी शरण | करी माहेरची आठवण ||