श्री संत प्रल्हाद महाराज बडवे

बहू थोर थोर | हरिचे दास उदार ||
निज सुखे देती समरूप सर्वा | नेणति विषय विकार ||
श्रांत जनाते निववुनि वचने | निज पाद देती थार ||
प्रल्हाद प्रभु ज्याने विसंबे | करिती जगदुद्धार ||

पंढरी निवासा स्वामी पंढरीनाथा ||नि:संगसंगा नवघनसंघा श्री पांडुरंगा | आलो मी शरण चरणी ठेऊनि माथा ||1||
करूणा तरंगा नवघनरंगा श्रीरंगा रंगा |शिणलो संसारी वारी भवभयव्यथा ||2||
निगमागम सारा, कौस्तुभहारा श्रीजगदाधारा ||प्रल्हाद वरदा झडकरी पावे अनाथा ||3||